Posts

Showing posts from August, 2019

marathi kavita arsa new 2019

मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन कवीता घेऊन आलो आहे . आधी त्या कवितेबद्धल मी तुम्हाला थोडी फार माहिती सांगतो . कवितेचे नाव आहे '' हे असच चालायचं '' मित्रांनो आपला भारत देश लोकशाही प्रधान देश . देशाची कार्यप्रणाली हि आम्ही निवडून दिलेले राज्यकर्त्ये सांभाळत असतात . देशातील जनता प्रामाणिक पणे आपले कर्तव्य पाडत असते . उमेद्वारांच्यावर विश्वास जनता त्यांना निवडून देत असते . जे उमेदवार निवडून येतात , ते किती प्रामाणिक पणे आपली जबाबदारी , कर्तव्य पार पाडत असतात हा अभ्यासाचा विषय आहे. देशातील जनतेला न्याय मिळावा म्हणून संविधानामध्ये अनेक कायदे आहेत . सवलती आहेत , हक्क आहेत . पण कायदा सांभाळणारे किती कर्तव्य दक्ष  राहून काम करत असतात . हे सर्व सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते . व फक्त पाहतच राहते जो प्रयन्त संयम आहे तो प्रयन्त ...! marathi kavita arsa new 2019  '' हे असच चालायचं ''  हे असच चालायचं ... दीशाभूल करून जनतेची त्यांना भुलभुलैयात - भुलवायचं , राज्याचे कर्ते , पण भुतासारखं चकवायचं , मुर्गजळाची दिशा जनतेला दाखवायचं ... ! हे असच...

arsa kavita sangrah - by Rashid

संवेदनाशून्य  नेते  संवेदनाशून्य  नेते  लोकशाहीची  गातात  गीते  खुर्चिसाठी  मतलबी  व्यवहार  अन ..  हातात  तलवारीचे  पाते ...  शेतात  हिरवळी  त्यांच्या , घरात  भरलेले  पोते  शेतकरी , कामगारांचे  त्यांच्या  साम्राज्यात  पोट  रिते रिते ... कोण  कुणाचा  कशासाठी  का ...? जाणाऱ्यांचे  जाते  भ्रष्टाचाराशी  मतलब  अन  सत्तेशी  नाते  संवेदनाशून्य  नेते ... ! तरुणांची  ताकद  वापरली  जाते , धर्माचे  राजकारण  त्यांना  फायद्याचे  होते  बसवून  देवाला  देवळात , माणुसकीच  रक्तात  न्हाते , सर्व  जाणुनी  जनता , मग  त्यांनाच  का निवडून  देते ...? का ... चार  पैशासाठी  जनता  दिशाहीन  होते ...? उज्ज्वल  भविष्याचं  तर  सोडाच , वर्तमानच  जाचक  होते  त्या...