arsa kavita sangrah - by Rashid
संवेदनाशून्य नेते
संवेदनाशून्य नेते
लोकशाहीची गातात गीते
खुर्चिसाठी मतलबी व्यवहार अन ..
हातात तलवारीचे पाते ...
शेतात हिरवळी त्यांच्या ,
घरात भरलेले पोते
शेतकरी , कामगारांचे त्यांच्या साम्राज्यात
पोट रिते रिते ...
कोण कुणाचा कशासाठी का ...?
जाणाऱ्यांचे जाते
भ्रष्टाचाराशी मतलब अन सत्तेशी नाते
संवेदनाशून्य नेते ... !
तरुणांची ताकद वापरली जाते , धर्माचे राजकारण त्यांना फायद्याचे होते
बसवून देवाला देवळात ,
माणुसकीच रक्तात न्हाते ,
सर्व जाणुनी जनता , मग त्यांनाच का निवडून देते ...?
का ... चार पैशासाठी जनता दिशाहीन होते ...?
उज्ज्वल भविष्याचं तर सोडाच , वर्तमानच जाचक होते
त्यांची निवडच समाजासाठी घातक ठरते
संवेदनाशून्य नेते ...!
Comments
Post a Comment